Ad will apear here
Next
मराठी चित्रपट ‘टल्ली’चा मुहूर्त उत्साहात


मुंबई : झेब्रा एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेच्या ‘टल्ली’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व अभिनेते सुशांत शेलार यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.

या प्रसंगी चित्रपट निर्माते एम. के. धुमाळ, सतीश फुगे, दिग्दर्शक रामकुमार शेडगे, अभिनेते प्रशांत तपस्वी, अनिल नगरकर, किरण रोंगे, विष्णू घोरपडे, राजेश कोरे, एस. के. पाटील, योगेश कोळी, शिवा भाऊ पासलकर, रवींद्र बेंडभर या चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली होती. यामध्ये नामांकित कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, निर्मातेही सहभागी झाले होते.



संजय गोळपकर हे या चित्रपटाचे निर्माते असून, या अगोदर त्यांनी ‘चल चले’ या हिंदी, तर ‘बेधुंद’ या मराठी चित्रपटाची, तसेच ‘उतरंड’ या आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लघुपटाची निर्मिती केली आहे. गोळपकर हे यशस्वी उद्योजक असून, संगीत आणि चित्रपटांची त्यांना आवड आहे. या चित्रपटाची निर्मिती चांगल्या पद्धतीने होईल, असा विश्वास गोळपकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संगीताची धुरा गणेश-सुरेश ही तरुण जोडी सांभाळणार असून, या अगोदर या जोडीने ‘उतरंड’ या लघुपटाद्वारे नावलौकीक मिळवला आहे. या लघुपटाला अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. गणेश-सुरेश यांचा हा दिग्दर्शनाचा पहिला चित्रपट आहे. ‘मराठीतील नावाजलेले कलाकार या चित्रपटात काम करणार असून, लवकरच कलाकारांची नावे आम्ही जाहीर करून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे,’ असे गणेश-सुरेश यांनी या वेळी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZURBW
Similar Posts
‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल; तसेच ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्‍सक्रीप्‍शन मोफत मिळेल
‘भाजपने साधला समाजिक समतोल’ मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे
लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ मुंबई : लोणावळा येथे ५० घोड्यांसोबत पठारी खेड्यांत ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप २०१८’ आयोजित करण्यात आली होती.
‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान मुंबई : ‘लेक्सस’तर्फे लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड इंडिया (एलडीएआय) या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी १२ विविध वर्गवारींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराच्या पहिल्याच वर्षी ७००हून अधिक प्रवेशिका ‘लेक्सस’कडे आल्या होत्या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language